Posts

Showing posts from October, 2020

आई-बाबा

आजकालच  युग  किती  स्वार्थी  झालयना ......जी  प्रत्येक गोष्ट करायची  ती  स्वार्था  साठी. हा  काळ  स्वार्थाच्या  व  पैश्यांच्या  अधीन  गेलेला  आहे. प्रेम  करायचं  स्वार्थासाठी,नाती  बनवायची  स्वार्थासाठी, जे  करायचं  त्यात  प्रत्येकाचं  काहीनाकाही  स्वार्थ  असतंच  पण.....ह्या  जगात  ह्या  जीवनात  आपल्यावर  निस्वार्थी पणे  प्रेम  करणारे  केवळ  दोनच व्यक्ती ते  म्हणजे  आपले "आई-बाबा. " आपल्या  दुःखात  आपल्याला  साथ देणारी, आनंदात  आपल्या  सहभागी  होणारी, स्वतःचे  दुःख  विसरुन लेकराच्या आनंदात  आनंद  मानणारी  व्यक्ती  म्हणजे  "आई " आणि  अपरिमित  कष्ट  करणारं शरीर,अपरिमित  कष्ट  करणारं  मन  स्वतःच्या  इच्छा  आकांक्षा  बाजूला  ठेवून  लेकरांसाठी  झटणारे  अंतःकरण ...