आई-बाबा

आजकालच  युग  किती  स्वार्थी  झालयना ......जी  प्रत्येक गोष्ट करायची  ती  स्वार्था  साठी. हा  काळ  स्वार्थाच्या  व  पैश्यांच्या  अधीन  गेलेला  आहे. प्रेम  करायचं  स्वार्थासाठी,नाती  बनवायची  स्वार्थासाठी, जे  करायचं  त्यात  प्रत्येकाचं  काहीनाकाही  स्वार्थ  असतंच  पण.....ह्या  जगात  ह्या  जीवनात  आपल्यावर  निस्वार्थी पणे  प्रेम  करणारे  केवळ  दोनच व्यक्ती ते  म्हणजे  आपले "आई-बाबा. "
आपल्या  दुःखात  आपल्याला  साथ देणारी, आनंदात  आपल्या  सहभागी  होणारी, स्वतःचे  दुःख  विसरुन लेकराच्या आनंदात  आनंद  मानणारी  व्यक्ती  म्हणजे  "आई " आणि  अपरिमित  कष्ट  करणारं शरीर,अपरिमित  कष्ट  करणारं  मन  स्वतःच्या  इच्छा  आकांक्षा  बाजूला  ठेवून  लेकरांसाठी  झटणारे  अंतःकरण  म्हणजे  "बाबा ."
आई  लेकराला  बघायच्या  आधीपासून  त्याच्यावर  प्रेम  करते  आणि बाबा  आशी  व्यक्ती  जी  सर्वात  जास्त जपते . 
आई आपल्या लेकराला काही लागलं किंवा आपलं लेकरू कुठे तरी पडलं  हे  ऐकताच  किती जीव कासावीस होतो तिचा.... लेकराच्या डोळ्यात पाणी योनयो तिच्या डोळ्यात मात्र नक्की पाणी येईल. आई बाबांच्या काळजाचा तुकडा म्हणजे त्यांच मूल, बाबांना सगळेच घाबरतात ओरडतील म्हणून...पण खरं  सांगायचं झाला तर बाबा हे कलिंगडा सारखे असतात बाहेरून कडक आतून गोड व मऊ. 
आई दिवस रात्र आपल्या लेकराची   काळजी घेती. त्याला काय हवं  नको ते बघते आणि बाबा दिवस रात्र कष्ट करतात आपल्या लेकरासाठी त्याला पुढे शिकवण्यासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी भविष्य घडवण्यासाठी पैसे कमवतात. 
सगळ्या आई-बाबांना वाटतं का आपण आपल्या मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आपल्याला जे मिळालं नाही ती प्रत्येक गोष्ट आपल्या मुलांना देऊ आणि ते तसं करताही आई-बाबा पूर्णपणे कष्ट करून आपल्या मुलांना जे पाहिजे ते देता त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. 
त्यांच्या चांगल्या शिक्षणा साठी त्यांना दुसरीकडे देखील शिकायला पाठवतात आई बाबांना खूप दुःख होतं जेव्हा त्यांची मुलं दुसरीकडे शिकायला जातात पण एकीकडे आनंद हि होतो कि आपले मुलं काहीतरी बनतील भविष्य घडवतील आणि तास होतं  हि  पण चित्र मात्र पूर्ण पणे बदलून जातं. 
मुले मोठी होऊन नौकरी करतात. पैसे कमवतात त्यांना वाटतं कि आपण सगळं आपल्या स्वतःच्या जोरावर केलंय. आई बाबां  सोबत उद्धट  बोलू लागतात भांडू लागतात. हे मात्र पूर्णपणे विसरून जाता आपल्याला यश आलाय ते आपल्या आई बाबा मुळे आपल्यासाठी केलेल्या कष्टा मुळे गाळलेल्या घामाच्या एक एक थेंबा मुळे. पण मुलं बाबांना हे पण विचारू लागतात  कि ....."तुम्ही काय केलंय आमच्या साठी ? जे केलय मी ते मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर केलंय " हे मात्र बाबांना आपण तोंड वर करून विचारतो पण ह्या सगळ्यात आपण एक गोष्ट मात्र विसरतो कि "बाप  वो अजीम हस्ती है , के जिसके पसीने कि एक बुंद कि किमत भी औलाद कभी अदा नही करसक्ती. "
आपण मुलांनी एक गोष्टं मात्र नेहमी लक्षात ठेवावी कि पैश्यांनी  ह्या जगात सर्व  काही मिळेल पण....आई सारखा स्वर्ग आणि बाबां सारखी सावली कुठेच मिळणार नाही. 
कालचीच गोष्ट आहे मी जेवत होते आणि पपांनी मला विचारलं 'बाळा पाणी देऊ का तुला ?' मी बोलले नको पपा मी घेते तेव्हा ते बोलले कशाला उठते बाळा मी आहेना मी देतो पाणी. 
त्यात जो शब्द बोलले ना पपा  "मी आहेना !" तो शब्द खूप मौल्यवान आहे . खूप जण म्हंटले असतील मी आहे ना...पण तो शब्द कधी पाळला नसेल पण आई बाबा हा शब्द नेहमी पाळता ते बोललेले असो नसो ते आपल्या पाठीशी नेहमी उभे राहता आणि त्यांचा हाच शब्द आपल्याला ताकद देतो. 
म्हणून आयुष्यात दोन व्यक्तींची नेहमी काळजी घ्या पहिली "जे आपल्याला जिकवण्यासाठी  स्वतः हारता म्हणजे आपले बाबा" आणि दुसरी "आपल्या हरण्याला देखील आपलं जिंकणं  म्हणणारी आपली आई "
म्हणून एवढा लक्षात ठेवा जे काही करू शकलोय आयुष्यात ते आपल्या आई बाबा मुळे जे केलंय त्यांच्या जोरावर कारण "स्वप्न मोठी असावीत पण स्वप्न दाखवणाऱ्या आई वडीलां पेक्षा मोठी नाही . "
आपल्या आई बाबांच्या डोळ्यातून कधी पाणी येणार नाही ह्याची काळजी घ्या क्योकीं "जिस घर कि छत से पानी टपकत है ना  उस घर कि दिवरे कभी मजबूत नहीं होती. आई बाबांना नेहमी आनंदी ठेवा क्योकीं "मिलने को तो हजारो  लोग मिल जायेंगे  लेकिन हजारो गल्तीयों को माफ करने वाले माँ बाप नहीं मिलेंगे ."

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

we've always been

home.

one random tuesday?